लातूर : राज्यात एका बाजूला कोरोनाबाधित रुग्ण बरे होत असतानाच दुसऱ्या बाजूला कोरोनाचा संपर्क झालेल्या नवीन रुग्णांची संख्या वाढत आहे. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये आणखी नवे कोरोनाचे 05 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या 159 वर पोहोचली आहे.
तसेच लातूर मधून एक दिलासादायक बातमी हाती येत आहे. लातूर जिल्ह्यातील उर्वरित सात अहवालही निगेटिव्ह आले असून अद्यापि जिल्ह्यात एकही कोरोना बाधित नाही. आतापर्यंत ५० पैकी ५० अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, ‘अहवाल निगेटिव्ह असले तरी लोकांनी घराबाहेर पडू नये, पुढचे १५ दिवस महत्त्वाचे आहेत. काळीज घ्या, असं आवाहन त्यांनी जनतेला केलं आहे.
दरम्यान, ‘किराणा तसेच अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. काही दुकाने २४ तास सुरू ठेवण्याला परवानगी दिली आहे. त्यामुळे गर्दी करू नये, बाहेर पडू नका, असं देखील याबाबत बोलताना त्यांनी सांगितले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

