टीम महाराष्ट्र देशा : सोनाली कुलकर्णी म्हणजे अभिनय, सौंदर्य आणि दिलखेचक नृत्याने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री. सोनाली कुलकर्णीच्या या नव्या ‘ग्लॅम लुक’चे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि तिच्या चाहत्यांना विश्वास ठेवणं कठीण झालं.

या नव्या ‘ग्लॅमरस लुक’ने सोनालीने पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना घायाळ केलं आहे. ब्लॅक ब्युटीमध्ये खुललेलं हे सोनालीच सौंदर्य एकदा पाहाच. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही नेहमीच विविध स्टाइलमधले फोटो सोशलमीडियावर अपडेट करत असते. सोनालीचे स्कर्ट, जीन्स, वन पीसमधले फोटो सोशलमीडियावर आतापर्यंत आपण नेहमीचे पाहिले आहेत.

सोनालीने नुकताच अपलो़ड केलेल्या एका फोटोने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. या फोटोत तिचा लुक एकदम हटके आहे. नेहमी लांब केसांमध्ये दिसणारी सोनाली या फोटोत ब्लॅक ब्युटीमध्ये दिसते आहे. तिच्या या फोटोचे सोशलमीडियावर भरभरून कौतुक होते आहे.विविध सिनेमातून वेगवेगळ्या भूमिका साकारत सोनालीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.

दरम्यान, ‘धुरळा’ राजकीय खेळीचा एक नवा डाव मांडत नुकताच धुरळा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. समीर विध्वंस दिग्दर्शित हा चित्रपट येत्या 3 जानेवारी 2020 रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी हिने या चित्रपटाच्या प्रमोशच्या दृष्टीने साडीतला एक हटके ग्लॅमरस लूक सोशल मिडियावर शेअर केला आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1209394738433949696?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1209393645092098048?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

