पुणे : आज पुण्यातून चार श्रमिक रेल्वे गाडय़ा सोडण्यात येणार असून त्यातून पाच हजार कामगार, मजुरांना मूळगावी पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. टाळेबंदीमुळे शहरासह जिल्ह्य़ात अडकलेले १६ हजार कामगार, मजूर आतापर्यंत विशेष १३ श्रमिक रेल्वे गाडय़ांनी मूळगावी गेले आहेत.
डॉ. म्हैसेकर यांनी दूरचित्रसंवादाद्वारे पत्रकारांना माहिती दिली कि, श्रमिकांना मूळगावी पाठवण्यासाठी रेल्वे आणि बसगाडय़ांची व्यवस्था करण्यात येत आहे. शुक्रवारी सात रेल्वे सोडण्यात येणार असून त्यामध्ये पुण्यातून चार, कोल्हापूर येथून तीन गाडय़ा सोडण्यात येतील आणि त्यातून नऊ हजार ३६८ श्रमिक मूळ गावी जाणार आहेत. आतापर्यंत एक हजार ४३ बसगाडय़ांतून १७ हजार २९० श्रमिकांना पाठवण्यात आले आहे.
भाजप बरोबर गेलेल्या आमदारांवर कारवाई करणार, शरद पवारांचा अजित पवारांना सज्जड दम
पुण्यातून आतापर्यंत १३ रेल्वे गाडय़ांतून १६ हजार ६४ श्रमिक मूळ गावी गेले आहेत. पुण्यातून जाणाऱ्या रेल्वे गाडय़ांची संख्या मर्यादित असून जाणाऱ्या श्रमिकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे पुण्यातून विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या अन्य चार जिल्ह्य़ांमध्ये गरजेनुसार पुण्यातील श्रमिकांना बसने पाठवण्यात येत आहे. त्यानुसार आतापर्यंत पुणे विभागात २८ रेल्वे गाडय़ा सोडण्यात आल्या असून त्यातून ३५ हजार १६३ श्रमिक मूळ गावी गेले आहेत.
जवळच्या राज्यांतील श्रमिकांना आणण्यासाठी बसगाडय़ांची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यानुसार आतापर्यंत १७० बसगाडय़ांतून पुणे, सातारा आणि सांगलीत मिळून तीन हजार ४३९ श्रमिक आले आहेत.
सालकरी म्हणून पुन्हा एकदा संधी द्या, राम शिंदेंचे मतदारांना भावनिक आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
