🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राज्याच्या राजकारणाने धक्कादायक वळण घेतले आहे. अनपेक्षितरित्या भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवारांचा पाठींबा घेत सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. एवढ्यावरचं थांबले नसून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
अजित पवारांच्या या निर्णयानंतर महाविकास आघाडी करू पाहणाऱ्या सर्वच पक्षांना धक्का बसला आहे. आता शिवसेना , राष्ट्रवादी कॉंग्रेस , कॉंग्रेस या सर्व पक्षांनी एकत्र बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार म्हणाले की, साडेसात वाजता काही आमदारांना घेऊन जाण्यात आलं, असे कळालं. त्यानंतर माहिती काढली त्यात अजित अजित पवारांनी पाठींबा दिल्याचं वृत्त कळालं. हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे . याला पक्षाचा पाठींबा नाही. का निर्णय पक्षाच्या धोरणाच्या विरुद्ध आहे. प्रामाणिक कार्यकर्ता हा भाजप सोबत जाणार नाही. अजित पवारांच्या भूमिकेला जनता पाठींबा देणार नाही. जे भाजप बरोबर गेले आहेत आणि जाणार आहेत त्यांच्यावर पक्षांतराची कारवाई करण्यात येणार. १० ते ११ सदस्य अजित पवारांसोबत गेले आहेत. मात्र त्यातील काही आमदार पुन्हा येत आहेत.
पक्षाच्या अंतर्गत प्रक्रियेसाठी घेतलेल्या स्वक्षारांच्या दुरोपयोग झाला आहे. मात्र हे सरकार टिकणार नाही. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस हे तीनही पक्ष एकत्र राहणार आहेत. त्यामुळे भाजपला स्पष्ट बहुमत स्पष्ट करता येणार नाही. मला याचा धक्का बसला नाही. कारण याआधीही असे अनुभव आले आहेत. १९८० मध्येही अमदास सोडून गेले होते. मात्र त्यानंतरच्या निवडणुकीत बहुमताने सरकार आले. अजित पवार फुटतील अस कधी वाटलं नव्हतं तसेच सुप्रिया सुळेंचे नाव मुख्यमंत्री पदाच्या यादीत नव्हत, असे पवारांनी स्पष्ट केलं.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की,” राज्यात खेळ खंडोबा सुरु आहे. शिवसेना जे काही करते ते उघडपणाने करते. रात्री खेळ करत नाही. मात्र भाजप आमदार फोडून काम करत आहे”, असा टोला लगावला. काहीही झालं तरी आम्ही एकत्र आहोत आणि एकत्रचं राहणार आहोत. शिवरायांच्या महाराष्ट्रावर भाजपकडून फर्जिकल स्ट्राईक केला आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1198144724713926657?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1198148033050841088?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
