🕒 1 min read
मुंबई : ‘सोशल डिस्टन्सिंगच्या सुचना आपण पाळल्या पाहिजेत. दोन लोकांमध्ये आवश्यक अंतर ठेवून आपण करोनाचा संसर्ग रोखू शकतो. लोकांनी काळजी घेतली तर काही ठिकाणी यातून शिथिलता शक्य आहे,’ असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज फेसबुकद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘केंद्राच्या सुचना पाळण्याची खबरदारी आपण घेतली तर करोनावर आपण मात करू शकू,’ असा विश्वासदेखील त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
पुढे पवार म्हणाले, ‘सध्या कठीण परिस्थितीत पोलीस दलातील लोक, वैद्यकीय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहे, राज्य शासनाचे कर्मचारी हळूहळू उपस्थित होऊ लागले आहेत. या लोकांप्रती आत्मीयता दाखवली आहे. या कर्मचाऱ्यांची आपुलकीने वागताना त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देणे आणि विश्वास देणे, आपण सगळे एकत्र आहोत ही भावना निर्माण करणे गरजेचे आहे,’ असं ते म्हणाले.
दरम्यान, ‘महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास मुंबई, पुणे, कल्याण-डोंबिवली, ठाणे या ठिकाणी कठोरपणे नियमांची अंमलबजावणी केली पाहिजे. आकडा आपण शून्यावर आणणारचं या आवाहनाला आपल्याला सामोरे जायचंय,’ असं शरद पवार म्हणाले.


