Share

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यास ठाकरे सरकार अपयशी ; मुंबईतील धारावी आणि गोवंडीत लष्कर बोलवा

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – देशात आणि राज्यात कोरोनाच थैमान सुरूच आहे. राज्याचा कोरोना रुग्णांचा आकडा रोज वाढतो आहे. मुंबई तर कोरोनाचा हॉट स्पॉट झाला आहे. तसेच देशात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. यावरूनच विरोधी पक्षाकडून राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली जात आहे.

आता भाजपचे राष्ट्रीय माध्यम पॅनलिस्ट तुहिन सिन्हा यांनी ‘द प्रिंट’ या वृत्त संकेतस्थळावर प्रकशित आपल्या लेखमध्ये मुंबईतील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्र सरकारने लष्कराला पाचारण कराव अशी मागणी केली आहे. मुंबईतील धारावी आणि गोवंडी भागात कोरोनाच्या फैलावाची स्थिती चिंताजनक असून केंद्राने येथे लष्कराला नियुक्त करावं असं त्यांनी म्हटलं आहे.

आपल्या लेखात त्यांनी राज्य सरकारमध्ये योग्य समन्वयाचा अभाव आहे, केरळ आणि महाराष्ट्र यांची तुलना करत महाराष्ट्रात राज्य सरकार कोरोनाशी लढण्यात अपयशी ठरत आहे असं म्हटलं आहे. तसेच अनंत करमुसे, वाधवान , वांद्रे गर्दी  याचा दाखला देत त्यांनी राज्यातील गृहविभागाच्या मंत्र्यांवरही टीका केली आहे.

तुहिन सिन्हा यांचे ट्वीट-

आपल्या लेखाबद्दल आपली भूमिका सांगताने तुहिन सिन्हा यांनी ट्वीटरवर आपले मत मांडले आहे. ते म्हणाले,

‘महत्वाचे मुद्धे

१) लेखाचे शीर्षक माझ्या निर्णयावर अवलंबून नाहीत.

२) आर्टिकल हे कठोर, पडताळणी करण्याजोग्या तथ्यांवर आधारित आहे ज्यात जशी परिस्थिती आहे त्याप्रमाणे चित्रण केले आहे.

३) निवडक भागात जिथे परिस्थिती हाताबाहेर जात आहे तेथे चांगल्या हेतूने ( मुख्यमंत्र्यांनीही ) सैन्य दलाला जबाबदारी देण्यास आक्षेप का असावा?’

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!