Share

#corona : ‘प्रसार माध्यमातील सक्रीय पत्रकारांची कोरोना चाचणी करा’

Published On: 

मुंबई : ‘कोरोना’ला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु आहे मात्र डॉक्टर, पोलिस याचप्रमाणे आरोग्यविभागातील कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता बाहेर पडत आहेत. सरकार आणि पोलीस यंत्रणा मोठया प्रमाणात प्रयत्न करत आहे.

याचप्रमाणे वृत्तवाहिन्यांचे सर्वच प्रतिनिधी दिवसरात्र बातम्या प्रसारणाचे काम करत आहेत. त्यांचे हे काम जोखमीचे असून त्यांना या कामासाठी बाहेर पडावेच लागत आहे. याच पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सर्व माध्यमातील लोकांची चाचणी करावी, अशी मागणी केली आहे.

याबाबत बोलताना पुढे देसाई म्हणतात, ‘वृत्तवाहिन्यांच्या सर्वच प्रतिनिधींचे काम जोखमीचे असून त्यांनी आपले स्वास्थ सांभाळून काम करावे तसेच त्यांच्या सर्वत्र फिरण्यावर बंधने असावीत. यासाठी शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने वाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या प्रतिनिधींशी संपर्क साधून त्यांची चाचणी करण्यासाठी देसाई यांनी महासंचालक, माहिती व जनसंपर्क यांनाही सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, एक चॅनल्स असलेल्या समुहाच्या सुमारे 6 कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती आज यावेळी बोलताना शुभास देसाई यांनी दिली. तसेच मुंबईतील एका नामांकित वाहिनीचे सक्रीय पत्रकार यांची कोरोना चाचणी पॉझीटिव्ह आली होती, असं देसाई यांनी सांगितले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!