Share

महाराष्ट्र राज्यसरकारने ही सर्व आमदारांचा दोन वर्षांचा विकासनिधी आणि 30 टक्के वेतन कपात करावी

Published On: 

मुंबई : केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार सर्व खासदारांचा दोन वर्षांचा स्थानिक विकास निधी तसेच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री सर्व खासदारांचे वेतन 30 टक्के कपात करून सर्व निधी कोरोना निर्मूलनासाठी वर्ग केला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेऊन असा निर्णय केंद्रसरकारप्रमाणे निर्णय घ्यावा. राज्यातील विधान परिषद आणि विधान सभेच्या सर्व आमदारांचा दोन वर्षांचा विकास निधी ; तसेच सर्व आमदारांचे मंत्र्यांचे वेतन 30 टक्के कपात करून सर्व निधी कोरोना निर्मूलनासाठी वर्ग करावा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत। त्यामुळे महाराष्ट्राने अधिक खबरदारी घ्यावी. येत्या 14 एप्रिल ला लोकडाऊन ची मुदत संपत असली तरी कोरोनाचा जो प्रादुर्भाव वाढत आहे ते पाहता लोकडाऊन ची मुदत 30 एप्रिल पर्यंत वाढविणे आवश्यक ठरत आहे. त्यामुळे 30 एप्रिल पर्यंत लोकडाऊन ची मुदत वाढविली पाहिजे असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

लोकडाऊन च्या काळात लोकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करू नये.घराबाहेर पडू नये अन्यथा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास सरकार ला लोकडाऊन ची मर्यादा वाढवावी लागेल असा ईशारा ना रामदास आठवले यांनी दिला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!