मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. आतापर्यंत हजारों लोकांना यामुळे जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रातही या रोगोने थैमान घातले आहे. कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
विविध क्षेत्रातील मंडळी आर्थिक मदतीचा हात पुढे करताना दिसत आहेत. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधीला १० लाख रुपयांची मदत केली आहे. ‘माझ्याकडून ही छोटीशी मदत आहे. समुद्रात मी फक्त पाण्याचा एक थेंब टाकला आहे. या कठीण प्रसंगी मदत करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. घरामध्येच सुरक्षित राहा,’ असे आवाहन त्याने जनतेला केले आहे.
आतापर्यंत सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, अक्षय कुमार, रतन टाटा यांच्यासह अनेक मंडळींनी मदतीचा हात पुढे केला आहे. तमेच सर्वच आमदार आणि खासदारांनीही सरकारला आर्थिक मदत केली आहे.
दरम्यान, जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतात हा आकडा 1100 च्या वर पोहोचला आहे. तर महाराष्ट्रात हा आकडा 200 च्या वर पोहोचलेला आहे. या जीवघेण्या रोगाचा संसर्ग थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपुर्ण देशात लॉकडाउनची घोषणा केलेली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
