सातारा : राज्यात आज चार नवे करोनाचे रुग्ण आढळले आहेत. यासह आता राज्यात कोरोनाग्रस्थांचीवर पोहोचली आहे. नव्याने आढळलेल्या ४ रुग्णांना पैकी ३ पुण्यातील आणि १ साताऱ्यातील असून. राज्याच्या ग्रामीण भागातही करोना रुग्ण आढळल्याने काळजी वाढली आहे.
राज्यात काल एका करोना रुग्णाचा मृत्यू झाला होता तर रात्री उशिरापर्यंत ८ नवे करोना रुग्ण आढळले होते. काल दिवसभरात राज्यात २३ नवे कोरोना ग्रस्थ आढळले त्या पार्श्वभूमीवर राज्यात संचार बंदी देखील लागू करण्यात आली तसेच कालपर्यंत राज्यातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या ९७ वर पोहोचली होती आज तोच आकडा १०१ झाला आहे.
दरम्यान,अनेक नेते लोकांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून जागृत करण्याचं काम करताना पाहायला मिळत आहेत. खा. उदयनराजे भोसले यांनी देखील फेसबुक पोस्ट करून लोकांना सुरक्षित राहण्याबद्दल आवाहन केले आहे.
भोसले आपल्या पोस्ट मध्ये म्हणतात, आपण सर्वांनी स्वतःची काळजी घेतल्यास कोरोनाला घाबरण्याचे कारण नाही.सातारा, सांगली येथे कोरोना रुग्ण सापडले असले तरी लोकांनी घाबरून, गडबडून जाऊ नये. लक्षात ठेवा संघर्ष आपल्या सर्वांच्या रक्तात आहे. आपले प्रशासन या रोगाचा निपटारा करण्यासाठी मोठ्या हिमतीने प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे त्यांना फक्त आपल्या सर्वांच्या सहकार्याची नितांत गरज आहे. आपण सर्वांनी भारत सरकार ने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर स्वयंशिस्तीत पालन केल्यास या रोगाला मात देऊ शकतो.
याच पोस्ट मध्ये भोसले यांनी काही सूचना देखील केल्या आहेत.काहीही झाले तरी आपण आपल्या घराच्या बाहेर पडू नका.घरातील सदस्याला ताप, डोके दुखी, सर्दी, खोकला, घसा दुखणे इत्यादी त्रास होत असेल तर आपल्या नजीकच्या डॉक्टर शी संपर्क साधा.सर्वांनी एकमेकांना आधार देणे व कोणामध्ये भीती असेल तर ती दूर करणे महत्त्वाचे आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

