🕒 1 min read
मुंबई : ‘कोरोना’शी दोन हात करण्यासाठी तसेच कोरोनाच्या विळख्यातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गर्दी करू नका, घराबाहेर पडू नका असं आवाहन केलं आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी कोकणवासीयांना विनंती केली आहे. ‘लोकांनी गावी न येता आपल्या मुंबईच्या घरी राहावे, कारण गावी आल्यामुळे इथे व्हायरस पसरण्याची शक्यता आहे,’ असं मत व्यक्त केलं आहे.
एक नम्र विनंती
सलग सुट्टी असल्यामुळे खूप चाकरमानी आपल्या गावाकडे म्हणजे सिंधुदुर्ग-रत्नागिरी कडे निघाले आहेत..
या लोकांनी गावी न येता आपल्या मुंबई च्या घरी राहावे कारण गावी आल्यामुळे इथे virus पसरण्याची शक्यता आहे!
हि वेळ सुट्टी नाही आपल्या कुटुंबियांना सुरक्षित ठेवण्याची आहे!— Nitesh Rane (@NiteshNRane) March 20, 2020
पुढे ते म्हणतात, ‘सलग सुट्टी असल्यामुळे खूप चाकरमानी आपल्या गावाकडे म्हणजे सिंधुदुर्ग-रत्नागिरीकडे निघाले आहेत. या लोकांनी गावी न येता आपल्या मुंबईच्या घरी राहावे, कारण गावी आल्यामुळे इथे व्हायरस पसरण्याची शक्यता आहे! ही वेळ सुट्टी नाही आपल्या कुटुंबीयांना सुरक्षित ठेवण्याची आहे, असं ट्विट करत नितेश राणे यांनी केलं आहे.
दरम्यान, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, मीरा-भाईंदर, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, खोपोली, पेण, पनवेल, अलिबाग, उरण, पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड. या शहरांतील जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
