Share

चिकन खाल्ल्याने कोरोना होतो’ अशा अफवा पसरवणाऱ्या दोन युट्युब चॅनेलवर पुणे पोलिसांची कारवाई

Published On: 

पुणे : चिकन खाल्ल्याने कोरोना व्हायरसची लागण होते अशा प्रकारच्या खोट्या बातम्या युट्युब चॅनेलद्वारे पसरवणाऱ्या दोन युट्युब चॅनेलवर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी याप्रकरणी आंध्रप्रदेश, काकीनाडा येथून मोहम्मद अब्दुल सत्तार याला अटक केली तर उत्तर प्रदेशातील बाभानवली बुजुर्ग येथून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘चिकन खाल्ल्याने कोरोना होतो’ अशी अफवा पसरवल्याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडे तक्रार आली होती. या प्रकरणाचा तपास करीत असताना अशाप्रकारे अफवा पसरवणारे दोन व्हिडीओ उत्तरप्रदेश आणि आंध्रप्रदेशातून युट्युबवर अपलोड झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांच्या पथकांनी त्या त्या राज्यात जाऊन कारवाई केली. यातील एकाला अटक केली तर अल्पवयीन असलेल्या एका मुलालाही ताब्यात घेतले.

दरम्यान आरोपींनी सोशल मीडियावर आलेल्या व्हिडिओची कुठलीही खातरजमा न करता हे व्हिडिओ युट्युबवर अपलोड केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे कोणत्याही कुक्कुट उत्पादनामुळे कोरोना आजार होतो हे पुर्णतः अशास्त्रीय आणि अफवा आहेत हे पशुसंवर्धन खात्याने यापूर्वीच घोषित केले आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!