Share

जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालाबाबत आदित्य ठाकरे, म्हणतात…

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या जिल्हा परिषद निवडणुका पार पडल्या. यामुळे या निवडणूक निकालाची सर्वांना उत्सुकता होती. खास करून नागपूरचा गड राखण्यात भाजपला यश आलेले नाही. तर धुळ्यात राष्ट्रवादीला दे धक्का देत भाजपने जोरदार मुसंडी मारली. तर पालघर जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे.

राज्यातील सहा जिल्हा परिषदांमध्ये नागपूर, धुळे, पालघर, नंदुरबार, अकोला आणि वाशिम यात केवळ धुळ्यात भाजपला यश मिळाले. बाकी पाच ठिकाणी भाजपला पराभवाचा मोठा धक्का बसला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने जिल्हा परिषदांमध्येही भाजपची कोंडी करत धुव्वा उडाला आहे.

याच पार्श्वभूमीवर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज पुन्हा महाराष्ट्रातील जनतेने शिवसेनेला आणि महाराष्ट्र विकास आघाडीला कल दिला आहे. मी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानतो आणि सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो, असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.

दरम्यान, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत भारतीय जनता पार्टी पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असल्याचा दावा भाजप महाराष्ट्रने ट्वीट करत केला आहे. सोबतच या निवडणुकीतील सर्व विजयी उमेदवारांचे विधानसभा देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन देखील केले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!