🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : मोठ्या नाराजी नाटकानंतर ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना खातेवाटप झालय. या खातेवाटपात नाराजांची यादी खूप मोठी आहे. मात्र या खातेवाटपावर तिन्ही पक्षातील अनेक दिग्गज नेते नाराज आहेत. पण यासगळ्यात एका अपक्ष आमदाराला शिवसेने कॅबिनेट मंत्रिपद दिलय इतकच काय तर जलसंधारण मंत्री सुधा केलय. या मंत्र्याची ओळख पाणीदार आमदार अशी आहे.
नेवासा तालुक्याचे आमदार आणि राज्याचे नवनिर्वाचित जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांना अहमदनगर जिल्हा पाणीदार आमदार म्हणून ओळखतो पण त्यांनी अस काय काम केलय की त्यांची ओळख पाणीदार आमदार अशी झालीय पाहूयात
नेवासा हा तालुका कायम विद्रोही विचाराचा आणि परिवर्तनवादी तालुका म्हणून ओळखला जातो. पूर्वी शेवगाव नेवासा असा संयुक्त मतदारसंघ असताना सुद्धा या तालुक्यातील मतदारांनी कधीच शेवगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधी निवडून दिला नाही. तालुक्यातील मतदारांनी यशवंतराव गडाख यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचा पराभव करुन वकिलराव लंघे पाटील यांच्या सारख्या कम्युनिस्ट नेत्याला दोन वेळा आमदार केलं.
मात्र 2009 साली नेवासा मतदारसंघ स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ झाला आणि यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव शंकरराव गडाख मतदारसंघाचे प्रतिनीधी झाले. शंकरराव गडाख यांच्यासमोर आव्हानाचा डोंगर उभा होता… दुष्काळ आ वासून समोरच होता.
सुमारे 26 टीएमसी क्षमतेच्या मुळा धरणाच्या लाभक्षेत्रात नेवासे तालुका आहे. 1972 नंतर पाण्याची उपलब्धता झाल्यानंतर या भागाचा आर्थिक स्तर उंचावला. अनेक गावांत शेती बागायती झाली. मात्र, ही परिस्थिती कायम तशीच राहिली नाही. पाणीटंचाई किंवा दुष्काळाचे चटके परिसराला प्रकर्षाने जाणवू लागले.
अशात शंकरराव गडाख आमदार झाले तेव्हा विहिरी तळ गाठू लागल्या. कूपनलिकाही उतरणीला लागल्या. सर्वांचेच धाबे दणाणले होते. आता काय? हाच प्रश्न सर्वांपुढे उभा. तालुक्यात दोन साखर कारखाने असल्याने सर्वाधिक उसाचच पीक घेतल जात. दुष्काळाची चाहूल फेब्रुवारी- मार्चमध्येच लागल्याने शंकरराव गडाख यांनी आपले कोशल्य दाखवत या संकटावर मात करायचं ठरवल.
त्यानंतर शंकरराव गडाखांनी दुष्काळ निवारण समितीची स्थापना केली. प्रत्येक गावाला भेट देऊन तेथील गरज व आवश्यक कामांची पाहणी करण्यात आली. या पाहणी दौऱ्यानंतर लोकवर्गणीतून जेसीबी, ट्रॅक्टर, मजुरांच्या साह्याने जलसंधारण कामाची सुरवात झाली. लोकसहभागातून जलसंधारणाची काही कामे सुरू केली. यात बंधारे दुरुस्ती, गाळ काढणे, काटेरी झाडे तोडणे, दरवाजा दुरुस्ती आदी कामांनी वेग घेतला.
तालुक्यातील विविध गावांत एकाच वेळी विविध कामे सुरू झाली. बंधाऱ्यातून काढलेला गाळ सांगवी, खडके, खरवंडी, अंतरवली, सुरेशनगर, सुकळी, फत्तेपूर, कौठा, चांदे, निपाणी, वडोली आदी गावांतील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात स्वखर्चाने नेला. सुमारे साडेतेरा लाख ब्रास गाळ पाचशे साठ शेतकऱ्यांनी बाराशे एकर शेतात पसरवण्याचे काम केल. यातील बहुतांश शेती पाच ते पंधरा वर्षांपासून नापिक वा पडीक होती. काही शेती खडकाळ व मुरमाड होती. गाळ टाकून घेतल्याने शेतीची सुपीकता वाढण्यास मदत होणार झाली; तसेच हे क्षेत्र पीक घेण्यायोग्य होत झाल. यामागे नियोजन आणि दुरदृष्टी होती शंकरराव गडाखांची.
लोकसहभागातून तालुक्यातील तीनशे चाळीस बंधारे, गावतळे, पाझर तलाव, साखळी बंधारे दुरुस्त केले. हे बंधारे पाण्याने भरून घेण्यासाठी तीन हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी घोडेगाव येथे रास्ता रोको आंदोलन केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीने मुंबई येथे तत्कालीन जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांची शेतकऱ्यांनी आणि आमदारांनी भेट घेऊन स्थितीची माहिती दिली. त्यानंतर बंधारे भरून घेण्यासाठी मुळा धरणातून आवर्तन सोडून सर्व बंधारे भरून घेण्यात आले. दुरुस्तीनंतर सहाशे दशलक्ष घनफूट पाणीक्षमता वाढली. पन्नासहून अधिक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. अनेक गावांत सुरू केलेले टॅंकर बंद झाले.
त्यावेळी राज्याचे ग्रामविकासमंत्री होते जयंत पाटील त्यांच्या कानावर या तरुण आमदारांचे कहाणी पडली आणि आणि त्यांनी थेट तालुक्यातील यांनी सांगवी, खरवंडी, वडाळा येथील बंधाऱ्याला भेट दिली. आणि या आमदाराच्या पाठीवर कोतुकाची थाप टाकली.
यातून प्रत्येक गावात एकजुटीचे दर्शन घडले. सुमारे 18,600 एकर क्षेत्राला याचा लाभ झाला तर 10 हजार 413 शेतकऱ्यांना प्रतेक्षात फायदा झाला. बारा गावांतील पाण्याचे टॅंकर बंद झाले. बाराशे एकर शेतीत गाळ टाकल्याने जमीन शेतीयोग्य झाली. पाचशे साठ शेतकऱ्यांनी शेतात गाळ पसरवला. विहिरी व कूपनलिकेला पाणी वाढले. 30 ते 35 वाड्या-वस्त्यांचे स्थलांतर वाचले.
अशा पद्धतीने तालुक्याला दुष्काळाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढून एका युवा आमदाराने आपली ओळख तालुक्यात ‘पाणीदार आमदार’ अशी बनवली. आता त्याच शंकरराव गडाख यांना महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जलसंधार मंत्रीपद मिळालाय तेव्हा त्यांच्याकडून तालुक्याच्याच नाही तर राज्याच्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्यात. आता पाहूयात नगर जिल्ह्याचा हा पाणीदार आमदार राज्यात आपल्या कामाचा ठसा कसा उमटावतोय.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

