टीम महाराष्ट्र देशा : हे सरकार महाविकास आघाडीचे नसुन फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे. सेना काँग्रेस हे फक्त नामधारी आहेत. सेना हिदुत्ववादी तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस धर्मनिरपेक्षवादी आहे अशा वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकञ आले असुन ही मंडळी महाराष्ट्राच्या हितासाठी नाही तर स्वताचा हितासाठी एकञ आल्याचा आरोप खा. नारायण राणे यांनी केली आहे.
शनिवारी खा. नारायण राणे त्यांची पत्नी निलीमा राणे सुन व नातवासह ते तुळजापूरला दर्शणासाठी गेले होते. त्यावेळी दर्शनानंतर पञकारांशी बोलताना ते म्हणाले की, ‘सेनेचे मंञी अब्दुल सत्तारांचा राजीनामा हि तर सुरुवात असुन यापुढे अनेक आमदार मंञी राजीनामा देतील व दोन महिन्यात सरकार कोसळणार असल्याने हे सरकार फसवणूक करणारे अल्पकालीन सरकार ठरेल अशी टीका त्यांनी केली.
त्यानंतर पुढे राणे म्हणाले की, ‘सरकार येउन सव्वा महिना झाला. बंगले, दालने घेतली माञ कारभार सुरु नाही. त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी काहीही प्रयत्न होत नाहीत. विद्यमान मुखमंञ्यांना प्रशासन चालविण्याचा एक टक्का हि अनुभव नाही. त्यांचा अभ्यास नसल्याने प्रशासनावर वचक राहणार नाही. कर्जमाफी वर बोलताना राणे म्हणाले कि, ‘परिपत्रकामध्ये कर्जमाफीची तारीख नाही, अर्थिक तरतूद नाही, सगळी फसवाफसवी चालू आहे. या सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसले आहे’.असं ते म्हणाले.
मुखमंत्री उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या मंञीपदा बाबतीत बोलताना राणे म्हणाले कि, ‘यांनी स्वताच्या घरात दोन मंञीपद घेतली गेल्या पन्नास वर्षापासून निष्ठेने काम करणाऱ्या शिवसैनिकांना डावलुन त्यांच्यावर अन्याय केल्याचा आरोपही केला’.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

