Share

कॉंग्रेसचा ‘हा’ ज्येष्ठ नेता मंत्रिमंडळात नसणार, अधिकृत मंत्र्यांच्या यादीत नावं नाही

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना आज होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसने स्थान दिलेले नाही. काल रात्रीच काँग्रेसने आपली अधिकृत मंत्र्यांची यादी प्रसिद्ध केली होती.त्या यादीत आठ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री अशा एकूण दहा मंत्र्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात झालेली काँग्रेस पक्षाची वाताहत पाहता.पक्षाला सावरण्यासाठी एका अभ्यासू नेत्याची आवश्यकता होती.ती पृथ्वीराज बाबांच्या रूपाने पूर्ण झाली आहे.त्यामुळे बाबांना मंत्रिमंडळात स्थान दिलेले नाही, असे एका काँग्रेस नेत्याने महाराष्ट्र देशा सोबत बोलतांना सांगितले. त्यावरून पृथ्वीराज चव्हाणांना महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष पद मिळू शकते असा अंदाज आहे.

दरम्यान राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू असताना काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची आधी मंत्रिपदासाठी चर्चा होती. मात्र आता काँग्रेसकडून त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अशातच खातेवाटपावरून काँग्रेसमध्ये मोठा पेच निर्माण झाला होता. सुरवातीला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांची नावे समोर आली. मात्र अशोक चव्हाण यांच्या मंत्रिपद दिल्यास पृथ्वीराज चव्हाण यांना कोणते मंत्रिपद द्यायचे अशा प्रश्न पक्षापुढे निर्माण झाला होता. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळावी लागणार असल्याचं बोललं जात आहे.

हे असणार कॉंग्रेसचे मंत्री

काँग्रेस : के सी पाडवी (उत्तर महाराष्ट्र), यशोमती ठाकूर (विदर्भ), अशोक चव्हाण (नांदेड), अमित देशमुख (लातूर), प्रणिती शिंदे (सोलपूर), सतेज पाटील (कोल्हापूर), विश्वजीत कदम (सांगली), सुनील केदार , वर्षा गायकवाड , अस्लम शेख , विजय वडेट्टीवार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!