टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकापाठोपाठ एक निर्णयांचा धडाका संपताना दिसत नाहीये. म.जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि शिवभोजन योजनेला मान्यता दिल्यानंतर ठाकरे सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका मात्र अॅक्सिस बँके’सारख्या खाजगी क्षेत्रातील देशात ‘टॉप 5’मध्ये असलेल्या बँकेलाही बसण्याची शक्यता आहे.
‘मुंबई मिरर ने दिलेल्या वृत्ता नुसार, राज्याच्या पोलिस विभागात दोन लाखाहून अधिक कर्मचारी कार्यरत असून त्यांचे वार्षिक पगार 11 हजार कोटींपेक्षा जास्त आहेत. मुख्यमंत्र्यांनी ‘पोलिस विभागाची वेतन खाती अॅक्सिस बँकेतून हलवण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. जवळपास दोन लाख पोलिसांची अकरा हजार कोटी रुपयांची खाती पुन्हा राष्ट्रीयकृत बँकेकडे वळवली जाण्याची चिन्हं आहेत. दरम्यान, फडणवीस सरकारच्या काळात पोलिस विभागातील बहुतांश वेतन खाती ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ बँकेकडून अक्सिस बँकेत वळविण्यात आली होती.
माजी मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस ‘अॅक्सिस बँके’त उच्च पदावर कार्यरत असल्यामुळे याचा संबंध जोडला जात होता. आता मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकारने ही खाती पुन्हा स्टेट बँकेसारख्या एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेकडे वळवण्याच्या हालचालींना जोर आला आहे. महिना अखेरीस होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर यासंबंधी निर्णय होण्याची शक्यता आहे. प्रत्येक खात्याला मंत्री मिळाल्यानंतर हा बदल करण्याचा ठाकरे सरकारचा मानस आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
