🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेचं तापले आहे. भाजप नेते आणि महाविकासआघाडीचे नेते यांच्यात चांगली जुंपली असल्याचं दिसत आहे. त्यात आता भाजप खा. नारायण राणे यांनी शिवसेना आ. दीपक केसरकर यांना पुन्हा लक्ष्य केले आहे. दीपक केसरकर हा एक नंबरचा थापेबाज, बंडलबाज माणूस असल्याची टीका केली आहे.
सावंतवाडी येथील पत्रकारांशी बोलताना त्यांनी ठाकरे सरकारबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, आमदार दीपक केसरकर हे थापेबाज, बंडलबाज असून, असा माणूस जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून लाभला हे जिल्ह्याचे दुर्दैव आहे. सावंतवाडीकरांनी अशा माणसाला निवडून देऊन स्वत:ची पीछेहाट करून घेतली आहे.
तसेच यावेळी राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केले आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री झालेल्या उद्धव ठाकरे यांना प्रशासनाची कोणतीही जाण नाही. राज्याच्या व जनतेच्या प्रश्नांचा अभ्यास नाही. त्यामुळे जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत व विकासाला खीळ बसेल. सत्तेत असलेले तीन पक्ष वेगवेगळ्या विचारांचे आहेत. हिंदुत्ववादी व धर्मनिरपेक्ष अशा वेगवेगळ्या विचारधारा असणारे हे तिन्ही पक्ष असल्यामुळे त्यांचे परस्परांशी जास्त काळ पटणार नाही. तीन पक्ष जास्त काळ एकत्र राहू शकणार नाहीत आणि हे सरकार सहा महिन्यांत कोसळेल, असे राणे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1206825329840414720?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1206823029008809984?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1206810656067837957?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
