🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. हे सरकार स्थापन करण्यासाठी खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची होती. दोन भिन्न विचारसरणीचे पक्ष एकत्र आल्याने काँग्रेससोबत जुळवून घेताना शिवसेनेला कसरत करावी लागत आहे.
” माझं नाव राहुल सावरकर नाही, तर राहुल गांधी आहे. त्यामुळे माफी मागणार नाही, ” अशी स्पष्ट शब्दांमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर, संजय राऊत यांनी राहुल गांधींना सूचक इशारा दिला आहे. अशातच कॉंग्रेस चे नेते नवाब मलिक यांनी ट्वीट करत संजय राऊत यांचीच फिरकी घेतली असल्याचे दिसत आहे.
‘सितारों के आगे जहाँ और भी हैं अभी इश्क़ के इम्तिहाँ और भी हैं : इक़बाल’ असे ट्विट नवाब मलिक यांनी केलं. हे ट्विट करुन मलिक यांनी संजय राऊतांची फिरकी घेतली, रेप इन इंडिया च्या वादग्रस्त विधानावरुन राहुल यांनी माफी मागण्यास स्पष्ट शब्दांत नकार देत त्यांनी त्यावेळी त्यांनी थेट सावरकरांचा उल्लेख केला. त्यामुळे शिवसेना आक्रमक झाली होती. संजय राऊत यांनी दोन ट्विट करुन राहुल गांधींना सूचक इशारा दिला.
सितारों के आगे जहाँ और भी हैं
अभी इश्क़ के इम्तिहाँ और भी हैं
: इक़बाल@rautsanjay61— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) December 15, 2019
तसेच अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा. इथे तडजोड नाही. जय हिंद,’ असं संजय राऊत यांनी त्यांच्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. ‘आम्ही पंडित नेहरू, महात्मा गांधी यांना मानतो तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे,’ अशा शब्दांमध्ये राऊत यांनी राहुल गांधींचं नाव न घेता त्यांना सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे काँग्रेस-शिवसेना यांच्यातील हे शीतयुद्ध नवाब मलिक यांनी शायरीतून व्यक्त केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1206105983405056002?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1206111415871791104?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
