🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील आजच्या राजकीय परिस्थितीला शिवसेना जबाबदार असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडी आणि शिवसेनेला लक्ष केले.
ते म्हणाले, ‘2019 ची निवडणूक आम्ही महायुतीत लढलो, त्याला राज्याच्या जनतेने स्पष्ट बहुमत दिले. तरीही शिवसेनेने मिळालेल्या जनाधाराचा विश्वासघात केल्याचा, आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच आमच्या मित्रपक्षाने जनादेशाचा विश्वासघात केला त्यामुळे आम्हाला विरोधात बसावं लागलं, असे फडणवीस म्हणाले.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, भाजपा हा ओबीसींचाच पक्ष आहे आणि कायम ओबीसींचा पक्ष राहिल, असे ते म्हणाले. ‘आमच्या काळात ओबीसी मंत्री झाले तेव्हा ते ओबीसी होते म्हणून झाले नाहीत, तर त्यांच्या क्षमतेमुळे ते मंत्री झाले. एवढंच नाही तर भाजपमध्ये मी माझा एकही गट तयार केला नाही. भाजपचे सगळे आमदार आमचेच आहेत,’ असे ते म्हणाले.
दरम्यान, ‘दोघांच्या जागा बहुमतापेक्षा कितीतरी जास्त जागा मिळाल्या. त्यामुळे आमचा पराभव झालेला नाही, असेही ते म्हणाले. मी पुन्हा येईन हा शब्द आम्ही म्हणूनच आहे, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1205485224076820481?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1205471942976794624?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
