Share

सिंहगडाचा वैभवशाली इतिहास सर्वदूर पोहचवण्यासाठी ‘सिंहगड फेस्टिव्हल’

Published On: 

शिवकालीन पराक्रमाचा  साक्षीदार असलेल्या सिंहगड किल्ल्याचा इतिहास सर्वदूर पोहोचवण्यासाठी ‘सिंहगड महोत्सवाचे’ आयोजन करण्याबाबत जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या उपस्थितीत नुकतच बैठक घेण्यात आली आहे, यावेळी सिंहगड महोत्सव आयोजनाबाबतचा  प्रस्ताव सांस्कृतिक कार्य विभागाने तात्काळ जिल्हा प्रशासनाकडे सादर करावा, अशी सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली. बैठकीला आमदार भिमराव तपकीर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कोहिनकर, तहसीलदार मीनल कळस्कर, सांस्कृतिक कार्य विभागाचे कार्यक्रम अधिकारी भरत लांघी, पुरातत्व विभागाचे जतन सहायक रामेश्वर निपाणे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. राव म्हणाले, सिंहगडाच्या गौरवशाली इतिहासाची माहिती शालेय विद्यार्थ्यांबरोबरच सर्वदूर पोहोचविणे गरजेचे आहे. यासाठी सिंहगड महोत्सव आयोजित करण्याबाबत प्रयत्न सुरु आहेत. यासाठी प्रथम राज्य शासनाला महोत्सवा बाबतचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. या प्रस्तावामध्ये महोत्सवा अंतर्गत घेण्यात येणारे सांस्कृतिक कार्यक्रम, सिंहगडाच्या इतिहासाचे स्मरण करुन देणाऱ्या विविध स्पर्धात्मक कार्यक्रमाची तसेच अन्य आवश्यक माहितीचा समावेश असणे गरजेचे आहे. रायगड महोत्सवाच्या धर्तीवर या महोत्सवाचे आयोजन करण्याबाबत योग्य ती माहिती घेण्याच्या सूचना श्री.राव यांनी सांस्कृतिक कार्य विभागाला दिल्या.

आमदार भीमराव तापकीर म्हणाले, सिंहगड महोत्सवामध्ये मराठी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश असावा. हा महोत्सव दर्जेदार होण्यासाठी यात शाळा, महाविद्यालये, विविध शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था तसेच सिंहगड संवर्धनासाठी व गडाचे पावित्र्य जपण्यासाठी कार्यरत संस्थांनाही सहभागी करुन घ्यावे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!