Share

“८० व्या वर्षाकडे”; बिग बींनी हटके फोटो शेअर करत स्वत:ला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Published On: 

मुंबई :  बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज ७९वा वाढदिवस. ११ ऑक्टोबर १९४२ मध्ये उत्तर प्रदेशच्या अलाहाबादमध्ये बिग बी यांचा जन्म झाला. अमिताभ यांचा चाहता वर्ग देखील प्रचंड मोठा आहे. त्यांच्या स्टाईलने आणि अभिनयाने त्यांनी प्रेक्षक वर्गात आपली खास जागा निर्माण केली आहे. अमिताभ यांनी १८० हून अधिक चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. सोशल मिडीयावर सक्रीय असलेले अमिताभ बच्चन यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा एक हटके फोटो शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/CU21Uf0AZrv/?utm_source=ig_web_copy_link

अमिताभ बच्चन यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत लिहिले की,  “८० व्या वर्षाकडे” असे कॅप्शन दिले आहे. तर ट्वीटरवर हा फोटो शेअर करत लिहिले की, “जेव्हा साठी (६०) तेव्हा पाठी आणि जेव्हा ऐंशी (८०) तेव्हा लस्सी!!! हे समजून घेणेही एक समज आहे,” असे अनोखे कॅप्शन दिले आहे. या फोटोमध्ये बिग बींनी करड्या रंगाचे जॅकेट, काळ्या रंगाची पँट आणि त्यासोबत हिरव्या रंगाचे शूज परिधान केले आहेत. यासोबत त्यांच्या खांद्यावर एक बॅगही पाहायला मिळत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सेलिब्रेटी आणि चाहते त्यांना सोशल मिडीयावर शुभेच्छा देत आहेत.

अमिताभ यांनी ‘सात हिंदुस्तानी’ (1969) या सिनेमाद्वारे अभिनय करिअरला सुरुवात केली होती.या सिनेमासाठी त्यांना 1000 रुपये मानधन मिळाले होते. हीरो म्हणून ‘जंजीर’ हा बिग बींचा पहिला हिट सिनेमा होता. 1973 मध्ये हा सिनेमा रिलीज झाला होता. यापूर्वी त्यांचे तब्बल 12 सिनेमे फ्लॉप ठरले होते. त्यांचे फेव्हरेट स्क्रिन नेम ‘विजय’ हे आहे. वीसहून अधिक सिनेमांमध्ये त्यांचे नाव विजय होते. दुसरे लोकप्रिय नाव ‘अमित’ होते. अमिताभ एकमेव असे अभिनेते आहेत, ज्यांनी सिनेमात सर्वात जास्त दुहेरी भूमिका आहेत. (डॉन, कसमें-वादे, सूर्यवंशम, बडे मियां-छोटे मियां, लाल बादशाह). ‘महान’ या सिनेमात त्यांनी तिहेरी भूमिका साकारली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!