🕒 1 min read
औरंगाबाद : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर ५ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत आपण आपल्या दुखवट्यावर ठाम असल्याचे औरंगाबाद विभागातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जीवावर एसटीच्या फेऱ्या वाढतांना दिसून येत आहे. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ७६ बसेस धावल्या तर ९ हजार ५०८ प्रवाशांनी आज एसटीने प्रवास केला.
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण या मुख्य मागणीसह इतर अनेक मागण्यांसाठी एसटी कर्मचारी ७ नोव्हेंबरपासून संपावर गेले आहेत. राज्य शासनाकडून संप मिटवण्यासाठी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले. यामध्ये वेतन वाढ यांसह अनेक सुविधा कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या. मात्र विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असलेल्या कर्मचाऱ्यांनी या सर्व आमिषांना बळी न पडता आपला लढा सुरूच ठेवला होता.
औरंगाबाद विभागात एकूण २२०० कर्मचारी असून यापैकी आत्तापर्यंत केवळ ८०० कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. १४०० कर्मचाऱ्यांनी संपातून आत्तापर्यंत माघार घेतलेली नाही. औरंगाबाद विभागातील काही कर्मचाऱ्यांनी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची रविवारी भेट घेतली. निकाल आपल्याच बाजूने लागणार असल्याने कर्मचाऱ्यांनी आता माघार घेऊ नये असे आवाहन त्यांनी कर्मचाऱ्यांना केले आहे.
आज धावल्या ७६ बसेस
सोमवारी (दि.२७) विविध मार्गावर औरंगाबाद विभागातील विविध आगारांतून, ७६ बस धावल्या. आगार क्र १ सिडको येथून जालना मार्गावर ११ बसच्या ४० फेऱ्या करण्यात आल्या. यात ९७३ प्रवाशांनी प्रवास केला. औरंगाबाद बीड मार्गावर १५ बसच्या ३० फेऱ्या केल्या. औरंगाबाद-सिल्लोड मार्गावर ५ बसने १६ फेऱ्या केल्या. औरंगाबाद-कन्नड मार्गावर २ बसच्या ८ फेऱ्या केल्या. तर औरंगाबाद-नाशिक मार्गावर ६ शिवशाही बसच्या १२ फेऱ्या, औरंगाबाद-पुणे मार्गावर १८ शिवशाही बसच्या २१ फेऱ्या, कन्नड-औरंगाबाद मार्गावर २ बसने ८ फेऱ्या करण्यात आल्या. अजिंठा येथे ३ बसच्या २४ फेऱ्या धावल्या. ४२३० पर्यटकांनी प्रवास केला. सोमवारी एकूण ७६ बसच्या २०९ फेऱ्या झाल्या. तर यातून ९५०८ प्रवाशांनी प्रवास केला.
हत्त्वाच्या बातम्या
- एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाईला वेग; 174 संपकऱ्यांना केलं बडतर्फ
- राज्यात लावलेल्या नव्या निर्बंधानंतर मुख्यमंत्र्यांनी दिली ‘ही’ महत्वाची सूचना
- कालीचरण महाराजांना महात्मा गांधींबाबत केलेलं वक्तव्य भोवलं; एफआयआर दाखल
- विधानसभेला अध्यक्ष मिळू नये ही भाजपची भूमिका; नाना पटोलेंचा आरोप
- चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन शरद पवारांनी घेतला खरपूस समाचार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

