Share

पुणे विभागातील 750 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी, कोरोना बाधित 2 हजार 734 रुग्ण

Published On: 

🕒 1 min read

पुणे :  पुणे विभागातील 750 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 हजार 734 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 842 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 142 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 94 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्हयातील 2 हजार 395 बाधीत रुग्ण असून 680 कोरोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 587 आहे.

#Coronvirus : २४ तासांत ३९०० नवे रुग्ण; आज देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

कोरोनाबाधित एकूण 128 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 88 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. सातारा जिल्हयातील 113 कोरोना बाधीत रुग्ण असून 14 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 97 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हयातील 176 कोरोना बाधीत रुग्ण असून 24 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 142 आहे. कोरोनाबाधित एकूण 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई, पुणे मंडळात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक

सांगली जिल्हयातील 35 कोरोना बाधीत रुग्ण असून 26 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हयातील 15 कोरोना बाधीत रुग्ण असून 6 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

चिंताजनक : पुण्यात 24 तासात 6 कोरोना बळी

आजपर्यत विभागामध्ये एकुण 27 हजार 429 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 26 हजार 301 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 1 हजार 186 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 23 हजार 509 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 2 हजार 734 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

आजपर्यंत विभागामधील 82 लाख 12 हजार 122 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 3 कोटी 26 लाख 74 हजार 234 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1 हजार 956 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

कोरोनाबाबत किरीट सोम्य्यांचे आरोग्य मंत्र्यांना पत्र, पत्रातून CM ठाकरेंना केले लक्ष्य

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!