Share

चिंताजनक : पुण्यात 24 तासात 6 कोरोना बळी

Published On: 

🕒 1 min read

पुणे : राज्यात काल कोरोनाबाधित ५८३ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या १० हजार ४९८ झाली आहे. काल १८० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १७७३ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ८२६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

याचप्रमाणे पुण्यात मात्र कोरोनाने चांगलेच हात पाय पसरले आहेत. गुरुवारी तब्बल 105 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 1700 वर पोहोचला आहे. तर दिवसभरात जिल्ह्यात सहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 92 वर गेला.

देशभरात १८२३ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर मागील २४ तासात ६७ जणांचा मृत्यू झाला आहे. आता देशभरातील करोनाग्रस्तांची संख्या ३३ हजार ६१० झाली आहे. यापैकी ८ हजार २७३ रुग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, काल राज्यात २७ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूंची संख्या आता ४५९ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे २०, तर पुणे शहरातील ३ आणि ठाणे शहरातील २ रुग्ण आहेत. या शिवाय नागपूर शहरात १ आणि रायगडमध्ये १ मृत्यू झाला आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!