Share

बळीराजाच्या हक्कासाठी लातूर जिल्ह्यात ७२ तासांचे अन्नत्याग आंदोलन

Published On: 

🕒 1 min read

लातूर : मराठवाड्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे. असे असतांना राज्य सरकारच्या वतीने अद्याप कोणत्याही स्वरुपाची मदत जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी ‘७२ तास अन्नत्याग आंदोलन’ करण्याची घोषणा केली आहे. उद्या सोमवारी ११ ऑक्टोंबर पासून या आंदोलनाला सुरूवात होणार आहे.

या संदर्भात आमदार संभाजी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘७२ तास, ७२ शेतकरी’ नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी अन्नत्याग करणार आहेत. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच ११ ऑक्टोबर रोजी लातूर शहर व लातूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक यात सहभागी होतील. १२ ऑक्टोबर रोजी उदगीर व अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील तर १३ ऑक्टोबर रोजी औसा व निलंगा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक यात सहभागी असतील.

सर्व शेतकरी बांधवांना पाठिंबा दर्शविण्यासाठी तसेच झोपलेल्या महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी अधिकाधिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे. ‘अन्नत्याग आंदोलन’ लातूर शहरातील शिवाजी चौकात होत असल्याने शहरातील पदाधिकाऱ्यांनी यात अधिक जबाबदारीने सामील व्हावे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचे चक्र सुरळीत असेल तरच शहरी अर्थव्यवस्था मजबूत होते, हा अर्थव्यवस्थेचा नियम आहे. त्यामुळे आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन आमदार निलंगेकर यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!