पुणे : कोणतीच धोकादायक लक्षणे नसलेल्या व्यक्तीला आता सातव्या दिवसापासून सलग तीन दिवस कोणत्याही औषधाची आवश्यकता नसल्याने अशा व्यक्तीला दहाव्या दिवशी घरी सोडण्याचा नर्णय घेण्यात आला आहे. तर पुढील सात दिवस मात्र त्या व्यक्तीने घरातच स्वतःला विलग करून घ्यायचे आहे. प्रशासनाने तसा शिक्का संबंधित व्यक्तीच्या हातावर मारावा, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणावर नाही म्हंटल तरी ताण येत आहे. लोकसंख्येच्या तुलेनेने या आरोग्य सुविधा ह्या अपुऱ्या आहेत. राज्य आणि केंद्र शासनाकडून अतिरीक्त सुविधा तयार करत आहे. मात्र हाच ताण कमी करण्यासाठी आता कोणतीच धोकादायक लक्षणे नसलेल्या व्यक्तीला आता 14 दिवसां ऐवजी 10 व्या दिवशीच घरी सोडण्यात येणार आहे.
याबाबत आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले की, सौम्य, अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या करोनाबाधित व्यक्तीला आता दहाव्या दिवशी घरी सोडण्यात येणार आहे. त्यासाठी त्याला सलग तीन दिवस कोणत्याही औषधाची आवश्यकता भासू नये. मात्र, त्या व्यक्तीला पुढील 7 दिवस घरीच विलगीकरणाच्या सूचना देऊनच घरी सोडले जाते.
दरम्यान चांगलेचं थैमान घातले आहे. मुंबई – पुण्यासारख्या मोठ्या शहरांनाचं कोरोनाने आपले केंद्र स्थान केलं आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 22 हजार 171पार गेला आहे. तर रविवारी दिवसभरात नवीन 1 हजार 278 कोरोना रुग्णांची नोंद झाली झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

