Share

राज्यातील कोरोनाची सध्याची आकडेवारी, वाचा फक्त एका क्लिकवर !

Published On: 

मुंबई : कोरोनाने राज्यात चांगलेचं थैमान घातले आहे. मुंबई – पुण्यासारख्या मोठ्या शहरांनाचं कोरोनाने आपले केंद्र स्थान केलं आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 22 हजार 171पार गेला आहे. तर रविवारी दिवसभरात नवीन 1 हजार 278 कोरोना रुग्णांची नोंद झाली झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

ते म्हणाले की, दिवसभरात नवीन 1 हजार 278 कोरोना रुग्णांची नोंद झाली झाली आहे. राज्यात आज 399 कोरोनाबाधित रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. आतापर्यंत राज्यभरात 4 हजार 199 रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत महाराष्ट्रात एकूण 2 लाख 38 हजार 766 नमुन्यांच्या कोरोना चाचणी झाल्या आहेत. त्यापैकी 2 लाख 15 हजार 903 जणांचे अहवाल कोरोनासाठी निगेटिव्ह आले आहेत. तर 22 हजार 171 जण पॉझिटिव्ह आले आहेत.

आज राज्यात 53 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृतांची संख्या 832 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंमध्ये 19 रुग्ण मुंबईमधून आहेत. मालेगावतही कोरोनाचा संसर्ग वाढत असून आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान पोलीस, आरोग्य कर्मचारी, आणि पत्रकार हे सेवेसाठी कोरोनाच्या संकटातही कार्यरत आहेत. त्यामुळे अनेक डॉक्टर आणि काही पोलिसांना देखील आपले कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण झाल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी करण्यासाठीच प्रशासन वारंवार नागरिकांना घरी सुरक्षित राहून सहकार्य करण्याचे आवाहन करत आहे.

भरतील कोरोनाबाधितांची संख्या ही 67 हजार 161 वर गेली आहे. तर त्यापैकी 2, हजार 212 जणांचा मृत्यू झाला आहे. सुदैवाची बाब म्हणजे 20 हजार 969 जण हे आतापर्यंत बरे झाले आहेत.
जगात 41 लाख 80 हजार कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापैकी 2 लाख 80 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर त्यापैकी 14 लाख 90 हजार 776 हे बरे होऊन घरी परतले आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!