Share

जिंतूर, सेलूमधील पुलांसाठी ७ कोटी मंजूर

Published On: 

🕒 1 min read

परभणी : मागील काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या योजनेला अखेर मंजुरी मिळाली आहे. जिंतूर येथील काही रस्ते व पूल अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. त्याची लवकरात लवकर पुनः बांधणी करणे आवश्यक आहे. यासाठी लागणारा निधी राज्य सरकारकडून मजूर करून घेत मोठा प्रश्न आ.मेघना बोर्डीकर यांनी मार्गी लावला आहे. सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागल्याचे बोलले जात आहे.

जिंतूर आणि सेलू येथील महत्वाच्या रस्त्यांना पुनः बांधणी करण्याची मोठी आवश्यकता होती. या रस्त्यांची मागील काही वर्षांपासून दयनीय अवस्था झाली होती. या कामांसाठी निधी मंजूर करून घेण्याचे काम आ. साकोरे यांनी करून दाखवले ७ कोटी ३३ लाख इतका निधी मंजूर करत येणाऱ्या काळात त्या रस्त्यांचा कायापालट केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे येणाऱ्या काळात जिंतूरकरांच्या समस्या काही प्रमाणात कमी होण्याची चिन्हे आहेत.

मागील काही वर्षांपासून थकलेल्या या रस्त्यांच्या कामामुळे जिंतूरकरांच्या दळणवळणावर सुद्धा परिणाम होत होता. या रस्त्याचे काम झाल्यावर जिंतूरकरांना सुतार मिळेल अशी अशा व्यक्त केली जात आहे. या विकास कामांमुळे अनेक गावांना जोडण्यात येणार आहे. त्याने येणाऱ्या काळात कनेक्टिव्हिटी चांगली होणार असल्याचे ही बोलल्या जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!