टीम महाराष्ट्र देशा : राज्यात परतीच्या पावसाने थैमान केले आहे. राज्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिसकून घेतला आहे. यामुळे शेतकर्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.
फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी यंत्रणेला पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच पुढे मुख्यमंत्री म्हणाले, ‘यावर्षी अतिशय प्रचंड पाऊस झाला. एका सुपरसायक्लॉनसह ४ वादळं अरबी समुद्रात तयार झाली. या पावसाची तीव्रता ऑक्टोबरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात अधिक होती. पुरावा म्हणून स्थानिक गावकऱ्यांनी नुकसानीचे काढलेले छायाचित्रसुद्धा ग्राह्य धरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.’
तसेच राज्यात एकूण १ कोटी ३८ लाख ७२ हजार ८६६ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. तर, सुमारे ३२५ तालुक्यांमध्ये ५४ लाख २२ हजार हेक्टरवरील ज्वारी, मका, धान, तूर, कापूस, सोयाबीन खरीप पिकांसह फळपिकं मोठ्या प्रमाणात बाधित झाली आहेत. प्रभावित भागाचे तत्काळ ड्रोन सर्वेक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1190507789514264576?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1190521035239542784?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1190507662141558784?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

