मुंबई : ‘द कश्मीर फाइल्स’ सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजताना दिसत आहे. लवकरच हा चित्रपट १०० कोटींचा आकडा पार करेल असं बोललं जातंय. चित्रपट पाहिल्यावर अनेक सेलिब्रेटींनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशात आता करणी सेनेनंही या चित्रपटावर भाष्य केलं आहे. करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूरजपाल अम्मू यांनी या चित्रपटाबद्दल बोलताना चित्रपटाच्या दिग्दर्शकांकडे एक छोटासा आग्रह केला आहे.
करणी सेनेनं झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी आग्रह केला आहे की, ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटातून होणाऱ्या कमाईतील ५० टक्के हिस्सा हा काश्मिरी पंडितांच्या कल्याणासाठी वापरण्यात यावा. करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूरज पाल अम्मू म्हणाले, ‘बऱ्याच राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. ज्यामुळे सामान्य माणसांना सहजपणे चित्रपट पाहता यावा. तर मग आता निर्माता आणि दिग्दर्शक यांनी पुढे येऊन या चित्रपटाच्या कमाईतील ५० टक्के रक्कम ही विस्थापित काश्मिरी लोकांच्या कल्याणासाठी द्यावी.’
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
