Share

‘५ टक्के आरक्षण देवून मुसलमानांच्या ‘दाढीला’ कुरवाळण्याचा शिवसेनेचा प्रयत्न’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – आमचा जुना मित्र पक्ष शिवसेनेनं मुसलमानांच्या मांडीला मांडी लावून बसायचं ठरवलय, घटनेमध्ये नसताना मुसलमानांना ५ टक्के आरक्षण देवून मुसलमानांच्या दाढीला हात लावण्याचा प्रयत्न केला.

ज्या सीएएमध्ये कुठेही मुसलमानांना धोका नसताना सीएए ची अंमलबजावणी करणार नाही का तर मुसलमानानांना खुश करता येतं, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

तसेच मुसलमानांचं लांगुनचालन करणारी शिवसेना ‘संभाजीनगरचं’ रक्षण करेल का?, असं सवाल करत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. ते औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात बोलत होते.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचे आम्ही वंशज आहोत. औरंगजेबाचे नाहीत त्यामुळे औरंगाबादचे नामकरण ‘संभाजीनगर’ झालंच पाहिजे, अशी मागणीही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, औरंगाबादच्या नामांतरासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल आहे. त्याला गती देऊन शहराचे नाव बदललं पाहिजे, असंही पाटील यावेळी बोलताना म्हणाले. त्यामुळे नामांतराचा मुद्दा महापालिका निवडणूकीत तापवला जाणार हे नक्की.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!