Share

सील केलेल्या मोबाईल टॉवर्सच्या मालमत्ताधारकाकडून 43 हजार वसूल

Published On: 

औरंगाबाद : अनधिकृत मोबाईल टॉवर्स आणि इमारतींविरुद्ध औरंगाबाद महानगरपालिकेने कारवाई तीव्र केली असून आज दि 07 फेब्रुवारी रविवार रोजी उत्तमनगर जवाहर कॉलोनी येथील अनधिकृत मोबाईल टॉवर मनपाने सील केला होता आज ज्या इमारतीवर सदरील टॉवर होते त्याचा थकबाकी पोटी नळ कनेक्शन खंडित करण्यात आला. तसेच किराडपुरा भागात सील करण्यात आलेल्या एक मोबाईल टॉवर ज्या इमारतीवर होता त्या घरमालकाकडून थकीत मालमत्ता कर एकूण 10,000 रुपये वसूल करण्यात आले.

चिश्तिया कॉलोनी येथे हाजी नूर खान यांच्या इमारतीवर इन्ड्स कंपनीच्या मोबाईल टॉवर सील करण्यात आला होता. आज त्यांच्याकडून थकीत मालमत्ता कर एकूण 50,000 रुपये भरणा करून घेतले. याशिवाय, सिडको एन-12 येथील श्रीमती इंदूबाई पाटील यांच्या घरावर असलेल्या मोबाईल टॉवर सील करण्यात आला होता.

त्यांच्याकडून आज मालमत्ता आणि पाणी पट्टी कर असे मिळवून सुमारे 43,000 रुपये वसूल करण्यात आले. सदरील कारवाई औरंगाबाद महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त श्री आस्तिक कुमार पाणडये यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त तथा कर निर्धारक व संकलक श्रीमती अपर्णा थेटे, विशेष वसुली अधिकारी श्री शिवाजी झनझन व संबंधित वार्ड अधिकाऱ्यांनी पार पाडली.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!