Share

देशात २४ तासात आढळले ४० हजार नवे कोरोना रुग्ण

Published On: 

नवी दिल्ली: देशात २४ तासात नव्या ४० हजार १२० रुग्णांची भर पडली आहे. तर ५८५ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय ४२ हजार २९५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. या आकड्यांतून स्पष्ट दिसून येते की, अजूनही देशातील कोरोना लाट ओसरलेली नाही. दरम्यान नव्या कोरोना रीग्नांची भर पडतच आहे.

या आकड्यांमुळे देशातील एकूण रुग्णसंख्या ३ कोटी २१ लाख १७ हजार ८२६ इतकी झाली आहे. दरम्यान देशात उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३ कोटी १३ लाख २ हजार ३४५ वर पोहोचली आहे. देशात सध्या ३ लाख ८५ हजार २२७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान देशात करोनामुळे आतापर्यंत ४ लाख ३० हजार २५४ जणांचा मृत्यू झाला आहे.

तर देशभरात आतापर्यंत ५९ कोटी ९५ लाख ८२ हजार ९५६ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. तर महाराष्ट्रामध्ये एकूण ४ कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. कोरोना कमी होताच नाही तोच देशात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हायरसचेही रुग्ण वाढतच आहेत. त्यामुळे देशभरात कोरोना अजूनही संक्रमित होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!