🕒 1 min read
नवी दिल्ली : कोरोना संकट काळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील ४ महिला आयपीएस अधिकाऱ्यांना राष्ट्रीय महिला आयोगाने ‘कोविड वूमन वॉरियर’ पुरस्कार देऊन गौरविले आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते ‘कोविड वुमन वॉरिअर’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या २९ व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी येथील विज्ञान भवनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री जावडेकर यांच्यासह राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा तसेच आयोगाचे इतर सदस्य उपस्थित होते.
सोलापूर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, औरंगाबाद पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंह, मुंबई पोलीस उपायुक्त नियती ठाकर-दवे यांनाही यावेळी गौरविण्यात आले. “कोरोना संक्रमणाचा हॉट स्पॉट बनलेल्या मुंबईतील धारावीसह नाशिक, औरंगाबाद, सातारा जिल्ह्यात या चौघींनी कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखून जनतेला उत्तम आरोग्य व इतर सुविधा मिळवून दिल्या.
या चारही महिला पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून जनतेची सेवा केली. मला त्यांचा विशेष अभिमान वाटतो.” असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हणत चारही महीलांचे अभिनंदन केले पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
महत्वाच्या बातम्या
- ‘सारथी’चं आंदोलन पुन्हा पेटण्याची शक्यता’ ; सरकारने फसवणूक केल्याचा आरोप
- हिंदू काय रस्त्यावर पडलेत ? देवेंद्र फडणवीसांची संतप्त प्रतिक्रिया !
- ‘संज्या राऊत झटपट दिल्लीला आंदोलनात फोटो काढायला गेला, मात्र कधी मराठा आंदोलकांना भेटला नाही’
- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी अर्थसंकल्प तयार करणे हे फार कठीण काम होते – शहा
- महाविद्यालये सुरु करण्याबाबत उदय सामंत यांनी दिली माहिती !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
