Share

मानवी अवयव घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अपघात; जीवनदान देणारे दुत सुदैवाने बचावले…

Published On: 

🕒 1 min read

वॉशिंग्टन : रुग्णांना नेणाऱ्या रस्त्यावरील रुग्णवाहिका असो वा एअर अ;ॅम्ब्युलन्स जीवन मृत्यूच्या मध्ये प्रवास करत असते यावेळी या जीवनवाहिनी चा अपघात होणे म्हणजे काळाचा घालाच म्हणावा लागेल असाच एका खासगी एअर अ;ॅम्ब्युलन्स असलेले हे हेलिकॉप्टर सदर्न कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या (यूएससी) केक हॉस्पिटलच्या छतावर कोसळले.

दान केलेले मानवी अवयव घेऊन जाणारे एक हेलिकॉप्टर लॉस एंजेलिसच्या एका इमारतीवर कोसळल्याची घटना शुक्रवारी घडली. यावेळी सुदैवाने हेलिकॉप्टरमध्ये असणाऱ्या तीनही लोकांचा जीव वाचला आहे. या तिघांनाही किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने या अपघातानंतर आग लागली नाही, तसेच हेलिकॉप्टरमधून इंधन गळतीही झाली नसल्याचे लॉस एंजेलिस अग्निशामक विभागाने स्पष्ट केले. या अपघातानंतर हेलिकॉप्टरच्या चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

यावेळी दान केलेले जे अवयव या हेलिकॉप्टरमधून नेण्यात येत होते, तेदेखील अपघातानंतर सुरक्षित असल्याचे आढळून आले. यानंतर लॉस एंजेलिसच्या अग्निशामक कर्मचाऱ्यांनी हे अवयव यूएससी केक रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. हे अवयव आता गरजूंच्या शरीरात ट्रान्सप्लांट करण्यात येत आहेत, अशी माहिती रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!