Share

लढा! ‘कोरोना’विरोधात : आरोग्यसेवेसाठी ४ कोटींचा ‘महापौर’ निधी

Published On: 

मुंबई : जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना व्हायरसच्या संकटापुढे संपूर्ण जग हतबल झालं आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 22 लाख पार पोहोचला आहे.

तसेच याच पार्श्वभूमीवर उपचार करताना आवश्यक असलेल्या साहित्यासाठी दोन रुग्णवाहिकांची खरेदी करण्यासाठी महापौर विकास निधी आणि आरोग्य निधीतून ४ कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत, याबाबतची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

याचप्रमाणे, उपलब्ध केलेल्या महापौर विकास निधीतून २ हजार ५०० पीपीई किट्स, ८ स्वाब बूथ, १०० इन्फ्रारेड थर्मामीटर आणि ९ हजार २०० एन. ९५ मास्क खरेदी केले जाणार आहेत. तर महापौर आरोग्य निधीतून २ रुग्णवाहिका आणि १७ थर्मल स्कॅनर बसवण्यात येणार आहेत.

दरम्यान, पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असताना आवश्यक साहित्य उपलब्ध असावे, यासाठी महापौर मोहोळ यांनी स्वतःच्या निधीतून तातडीने रक्कम उपलब्ध करून दिली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!