Share

नगरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ ; ATM मशीन लोखंडी साखळीला बांधून पळवून नेत होते, इतक्यात…

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : अलीकडच्या काही दिवसांत अहमदनगर शहरासह जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. आज पहाटे साडेतीनच्या सुमारास अहमदनगर शहरातील पाइपलाईन रोडवरील संकल्प अपार्टमेंटच्या तळमजल्यावर असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम सेंटर चोरट्यांनी फोडले. यावेळी तेथील एटीएम मशीन पळवण्याचा प्रयत्न चोरटे करत असताना मोठा आवाज झाला आणि या आवाजाने परिसरातील नागरिक जागे झाल्यामुळे चोरट्यांचा डाव फसला. या घटनेमुळे पहाटेच अहमदनगर शहरात एकच खळबळ उडाली.

आज पहाटे साडेतीनच्या सुमारास पांढऱ्या रंगाची कार घेऊन एटीएम फोडण्यासाठी चोरटे आले होते. चोरट्यांनी हे एटीएम फाउंडेशनमधून तोडले. मशीन फोडून त्यामधील पैसे काढता न आल्याने चोरट्याने मशीनच चोरून नेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी लोखंडी साखळीने एटीएम मशीन हे आपल्या कारला बांधले. कारचा वेग वाढवून ते मशीन सेंटरमधून ओढून काढण्याचा प्रयत्न केला.

मशीन सेंटरमधून ओढून काढताना यावेळी एटीएम सेंटरच्या काचा फुटून मोठा आवाज झाला. या आवाजाने परिसरातील नागिरकांना जाग आली. नागरिकांच्या भीतीने चोरट्यांनी मशीन जागीच टाकून तेथून पळ काढला. मात्र, या आवाजाने परिसरातील नागरिक जागे झाल्यामुळे चोरट्यांचा डाव फसला. या घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक सुरसे यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन या चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!