मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्प सादर केला आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे चाचणी केल्याशिवाय विधानभवनात येण्यास सक्त मनाई आहे. याचा फटका काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बसला आहे.
अर्थसंकल्पीय भाषण ऐकण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण आपल्या २० ते २५ आमदारांसोबत विधानभवनामध्ये दाखल झाले होते. पण या सर्व आमदारांनी कोरोनाची चाचणी केली नसल्याने त्यांना प्रवेश दिला गेला नाही. माजी मुख्यमंत्र्यांना विधानभवनात प्रवेश न दिल्यामुळे सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सपाचे आमदार अबू आझमी यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना विधानभवनात येण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह २० ते २५ आमदारांना प्रवेश देण्यात यावा. त्यांना दुसऱ्यांदा कोरोना चाचणी करण्याची माहिती त्यांना दिलेली नव्हती. यामुळे विधानभवन परिसरात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.
आज अर्थसंकल्पाचा दिवस असल्यानं त्यांना विधानभवनात बसण्याची परवानगी द्यायला हवी, अशी मागणीही अबू आझमी यांनी केली होती. परंतु असे केल्यास नियमांचे उल्लंघन होऊ शकते म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांना विधानभवनात येण्यास परवानगी दिली गेली नाही. दरम्यान माजी मुख्यमंत्री असणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांना विधानभवनात प्रवेश न दिल्यामुळे सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- बिहार विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेली शिवसेना आता गोव्याची निवडणूक लढवणार
- बिदाईला नवरी रडता रडता बेशुद्ध, ऱ्हदयविकाराने जागीच मृत्यू
- भूमाफियांसाठी राज ठाकरे यांनी नाणार बाबतची भूमिका बदलली ?
- जाणून घ्या राज्यात 20 हजार छोट्या सभा, बैठका घेण्यामागे नेमका भाजपचा उद्देश काय ?
- घायवळ,आंदेकर,मारणे पाठोपाठ आणखी एका कुख्यात गुंडाच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या


