पणजी- नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेली शिवसेना आता गोव्याची निवडणूक लढवणार आहे. गोव्यात पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना स्वबळावर 25 जागा लढवणार आहे.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली.पणजी येथील शिवसेना मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत खासदार राऊत यांनी गोव्यातील राजकीय परिस्थितीवर परखड मत व्यक्त करतानाच शिवसेना यावेळी स्वबळावर विधानसभा निवडणुका लढवण्याची तयारी करत असल्याची माहिती दिली.
खासदार राऊत म्हणाले, गेल्या वेळी आम्ही मगो आणि गोवा सुरक्षा मंचसोबत युती करून निवडणुका लढवल्या होत्या. युतीमध्ये फक्त तीन जागा आम्हाला मिळाल्या होत्या. युती झाली की, मर्यादा येतात. त्यामुळे पक्ष विस्तार अपेक्षित वेगाने होत नसल्याने यावेळी आम्ही स्वबळावर 25 जागा लढवण्याचे ठरवले आहे. 10 ते 15 ठिकाणी आमचे उमेदवार ठरले असून इतर उमेदवारांबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान,शिवसेनेने बिहार विधानसभा निवडणुकीतही उमेदवार उतरवले होते. बिहारमध्ये शिवसेनेच्या उमदेवारांचं डिपॉझिटही जप्त झालं आणि मानहानीकारक पराभवाचा सामनाकरावा लागला होता. त्यानंतर शिवसेनेने पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या :
- पोहरादेवीच्या विकासासाठी पाहिजे तितका निधी देणार-अजित पवार
- बिदाईला नवरी रडता रडता बेशुद्ध, ऱ्हदयविकाराने जागीच मृत्यू
- भूमाफियांसाठी राज ठाकरे यांनी नाणार बाबतची भूमिका बदलली ?
- जाणून घ्या राज्यात 20 हजार छोट्या सभा, बैठका घेण्यामागे नेमका भाजपचा उद्देश काय ?
- घायवळ,आंदेकर,मारणे पाठोपाठ आणखी एका कुख्यात गुंडाच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या


