Share

प्रसिद्ध लेखिका मीना देशपांडे यांचं अमेरिकेत निधन

Published On: 

वॉशिंग्टन: सुप्रसिद्ध लेखिका मीना देशपांडे यांचे करोनाच्या संसर्गाने निधन झाले आहे. त्या ८६ वर्षाच्या होत्या. आचार्य अत्रे यांच्या त्या कन्या होत्या. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर करोनावर उपचार सुरू होते. मात्र, त्यांची करोनासोबतची झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनावर साहित्य विश्वात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आज पहाटे त्यांचे रुग्णालयात निधन झाले.

करोनाची बाधा होण्याआधी त्यांची प्रकृती उत्तम होती. मात्र, करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांच्यावतीने देण्यात आली. मीना देशपांडे यांच्या निधनामुळे आचार्य अत्रे यांच्याशी निगडीत असलेला दुवा निखळला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

अधिवेशनाला जात असताना शिवसेनेच्या आमदाराला कोरोना असल्याचा मेसेज

मीना देशपांडे यांची साहित्य संपदा:

*आचार्य अत्रे प्रतिभा आणि प्रतिमा (संपादित, अत्र्यांच्या लेखनाविषयी अनेक लेखकांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह)

*आचार्य अत्रे यांच्या कऱ्हेचे पाणी या आत्मचरित्रानंतरचे पुरवणी चरित्र (खंड ६-७-८).

* पपा – एक महाकाव्य (सदरलेखन संग्रह)

* मॅरिलीन  मन्‍रो  (अनुवादित कादंबरी)

* मी असा झालो (आचार्य अत्र्यांच्या कऱ्हेचे पाणी ह्या पाच-खंडी आत्मचरित्रातून आणि त्यांच्याच मी कसा झालो या पुस्तकांतून निवडलेल्या उताऱ्यांचे संपादित चित्रमय संकलन, सहसंपादिका शिरीष पै)

दाऊदला दम देणारे आणि कधी काळी दाऊदला संरक्षण देणारे सत्तेत असताना धमकीचा फोन आलाच कसा? भाजप आमदार

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!