मुंबई: महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. आमदारांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून सरकारकडून काळजी घेतली जात आहे. अशातच आता शिवसेनेच्या एका ढाण्या वाघाला कोरोनाची लागण झाले आहे. रायगढमधील अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांना कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबलेलं यंदाचं पावसाळी अधिवेशन आजपासून दोन दिवस ( 7 आणि 8 सप्टेंबर) घेण्यात येणार आहे. कोव्हिड19 चे संकट लक्षात घेत या अधिवेशनाला येणाऱ्या प्रत्येक आमदाराची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. आमदारांना मास्क, फेस शील्ड, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज असे साहित्य दिले जाणार आहे. त्यामुळे विधिमंडळात ‘मास्कधारी’ सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर बरसताना दिसतील.
दाऊदला दम देणारे आणि कधी काळी दाऊदला संरक्षण देणारे सत्तेत असताना धमकीचा फोन आलाच कसा? भाजप आमदार
कोरोना चाचणी निगेटिव्ह येणाऱ्या आमदारांनाच सभागृहात प्रवेश दिला जाईल. सहव्याधी (कोमॉर्बिडीटी) असलेल्या आमदारांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अधिवेशनाच्या दोन्ही दिवशी सर्वांनी हॅन्डग्लोज, मास्क लावून फिरले पाहिजे. फेस शील्ड देखील बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोनामुळे एकत्र येण्याला बंधने आहेत.
आपण सर्वांनी विश्वास ठेवावा, कोयत्याला सन्मान नक्की मिळेल ; पंकजा मुंडेंचं भावनिक ट्विट
याआधी महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड,सामाजिक न्याय व विषेश सहाय्य मंत्री धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण,भाजपचे शहराध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे तसेच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली होती. मंत्रालय मंत्र्यांना कोरोना होऊ नये यासाठी विषेश काळजी घेतली जात आहे. मंत्र्यांना मोजक्याच लोकांन भेटता यावं यासाठीही प्रयत्न करत जात आहेत. विधानसभेचं कामकाजही पुर्ण क्षमतेनं सुरू झालेलं नाही.
‘कंगनासारखे उपरे आणि डिनो, गोमेझ, जॅकलिन आणि पटानी अस्सल मराठी! हो ना’
करोनाकाळात लोकांना आलेल्या अडचणी लक्षात घेता आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठ्या प्रमाणात सुट दिली आहे. एसटी बस,रेलवे, दुकाने, मॉल, खासगी बस सुरू करण्यात आल्या आहेत. पण सध्या राज्यातील मंदीर उघडावे म्हणून सरकारला विरोधी पक्ष धारेवर धरत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

