नागपूर : शहरात कोरोनाचा प्रकोप वाढतो आहे. परिस्थिती हाताबाहेर गेली असून शहरात १४ दिवसांचा लॉकडाऊन करावा, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी केली आहे. या मागणीचे पत्र त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना दिले आहे.
शहरात दररोज कोरोना रुग्ण वाढत आहेत. रुग्णांचा मृत्युदरही वाढलेला आहे. त्यामुळे नागपूरकरांमध्ये चांगलीच दहशत पसरली आहे. तरीही गर्दी कमी झालेली नाही. मास्क न लावता लोक फिरताना दिसत आहेत, अशांविरोधात कारवाई केली जात असलीतरी त्याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही. आतापर्यंत व्यापारीही लॉकडाऊनच्या विरोधात होते. मात्र, आता ते देखील मागणी करीत आहे.
शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे वनवे यांनी नमूद केले.
शहरात सात दिवसांच्या टाळेबंदीसह दर शनिवारी व रविवारी जनसंचारबंदी लागू करावी, कोरोनाबाधितांसाठी रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविण्यात यावी, प्रत्येक झोनमध्ये ऑक्सिजन सिलेंडरसह ५ अँम्बुलन्स, २ शववाहिका उपलब्ध करून द्याव्या, रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था करण्यात यावी, जम्बो कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात यावे आदी मागण्याही वनवे यांनी पालकमंत्री डॉ. राऊत यांना पाठविलेल्या पत्रातून केल्या आहेत. विरोधी पक्षनेते वनवे यांच्या मागणीला राष्ट्रवादीचे गटनेते दुनेश्वर पेठे, शिवसेनेचे किशोर कुमेरिया व बसपानेही पाठिंबा दर्शविला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- मनसेने फोडले पाथर्डीतील राष्ट्रीय महामार्गाचे कार्यालय, अभियंत्याच्या खुर्चीला घातला चपलांचा हार!
- ‘कांद्याला थोडा भाव मिळत आहे म्हणून केंद्र सरकारच्या पोटात पोटशूळ उठला’
- …अन्यथा शेतकरी शांत बसणार नाही, सदाभाऊ खोतांचा केंद्राला इशारा
- ‘कांदा निर्यात बंदी म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचा प्रकार’
- पंतप्रधान कांद्याचे वांदे करत आहेत – छगन भुजबळ


