🕒 1 min read
मुंबई: देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. या पाच राज्यांपैकी तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2022) रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा उतरणार आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत या संदर्भात माहिती दिली आहे. यावेळी बोलताना उत्तर प्रदेश येथील भाजपच्या सत्तेवर देखील पवारांनी वक्तव्यं केले आहे.
उत्तरप्रदेशात भाजपची सत्ता असून येथे निवडणुकीपूर्वी भाजपला एकामागेएक असे झटके बसताना दिसत आहेत. आजच योगी सरकारमध्ये मंत्री असलेले स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या पाठोपाठ आणखी तीन आमदारांनी भाजप पक्ष सोडत समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी देखील वक्तव्यं केले आहे.
स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या मंत्रिपदाचा आणि भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला यावर शरद पवारांना विचारले असता त्यांनी म्हटलं, स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंत्रिपदाचा आणि पक्षाचाही राजीनामा दिला आहे. राजीनामा देत त्यांनी समाजवादी पक्षाला समर्थन देण्याचं म्हटलं. त्यांच्यासोबत १३ आमदार आणि आणखी काही सहयोगी त्यांना समर्थन देणार असल्याचंही म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘गोव्यात जनमताची चोरी आम्ही होऊ देणार नाही’; देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्यं
- ‘…पण शिवसेनेला सोबत घेणार नाही’; देवेंद्र फडणवीसांची टीका
- ‘मलिकांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांना मेंदूत इंजेक्शनची गरज’; अतुल भातखळकरांची टीका
- ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत काळाच्या पडद्याआड; त्यांच्या जाण्याने कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली
- राज्यातील शाळा बंदला शिक्षण तज्ञाचा विरोध, म्हणाले तर तेव्हा मुंबईच्या शाळा…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
