Share

नोकरीचे आमिष दाखवून १२ लाखांची फसवणूक; शिक्षकाच्या नोकरीचे दाखवले होते अमिष

Published On: 

नांदेड : शहरात असलेल्या निवासी मतिमंद विद्यालयात विशेष शिक्षक पदावर नोकरी लावून देतो असे एका सुशिक्षिक बेरोजगाराला आमिष दाखवले. नोकरीसाठी युवकाला १२ लाख रुपयांची मागणी केली. मात्र पैसे देऊनही काम न झाल्याने पैसे परत मागितले आसता जिवे मारण्याची धमकी दिली. यामुळे युवकाने दिलेल्या तक्रारीनुसार विमानतळ पोलिस ठाण्यात संचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जळकोट तालुक्यातील कळनोर येथील संतोष भारत शिवशक्ती हे कामाच्या शोधात होते. कामाच्या शोधात असताना शहरातील नाथनगर येथील संस्थाचालक बालाजी प्रल्हादराव पावडे याने संतोष शिवशक्ती याला संस्थेत बोलावुन घेतले. संस्थेत आल्यानंतर संतोष भारत यांना किनवट तालुक्यातील घोटी येथील मतिमंद विद्यालयात नोकरी लावुन देतो असे सांगितले व त्याच्यांकडून १२ लाख रुपये घेतले.

यानंतर वारंवार पैशाची मागणी केली. नोकरी न दिल्यामुळे शिवशक्ती यांनी बालाजी पावडे याच्याकडे पैसे परत करण्याची मागणी केली. मात्र आरोपी टाळाटाळ करत होता आणि शिवशक्ती यांनी पैसे परत देण्यासाठी तगादा लावला असता आरोपी पावडे यांनी शिवशक्ती यांना जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर शिवशक्ती यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरिक्षक देवके हे करत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!