🕒 1 min read
उस्मानाबाद : तुळजापूर पोलिसांना काल केलेल्या कारवाईत मोठे यश प्राप्त झाले आहे. शहरातील लातूर रस्त्यावरील एका लॉजवर छापा टाकून पोलिसांनी वेश्या व्यवसाय करणाऱ्या नऊ महिलांसह सात पुरुषांना पकडले. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी करण्यात आली. शहरातील लातूर रस्त्यावर असणाऱ्या एका लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.
यात नऊ महिलांसह सात पुरुष आढळून आले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तुळजापूर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सदरचा गैरप्रकार उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
तीर्थक्षेत्र समजल्या जाणाऱ्या ठिकाणी अशी घटना घडणे दुर्दैवी आहे. घटना घडत असल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. येत्या काळात अशा घटना तुळापुरात घडू नये याची काळजी नागरिकांनी व पोलीसांनी घ्यायला हवी. मागील काही दिवसात धार्मिक स्थळामध्ये वाढत चाललेल्या असे प्रकार चिंतेचा विषय ठरत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- बोंबला … ३ लेकरांच्या आईने १४ वर्षाच्या प्रियकराला पळवून नेले; घटना ऐकून पोलीस देखील चक्रावले
- ‘माँ, माटी और मानुष’ ! बांगलमध्ये कोणीही सुरक्षित नाहीय’
- ‘My Men in frame’ लहान भाऊ, करीना आणि सैफसाठी तैमुरने बनवला खास पदार्थ !
- भोजपुरी अभिनेता निघाला दुचाकी चोर; दिल्ली पोलिसांनी केली अटक
- धक्कादायक : भाजपच्या लोकप्रिय खासदाराचा संशयास्पद मृत्यू; भाजपच्या संसदीय मंडळाची आजची बैठक रद्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
