अहमदनगर : राज्यसरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्वाकांक्षी असलेली गरीब व गरजूंना दहा रुपयांमध्ये शिवभोजन थाळी २६ जानेवारी पासून मिळण्यास सुरुवात होणार आहे. राज्यशासनाने गरीब व गरजू जनतेसाठी १० रुपयांत शिवभोजन सुरू करण्याचा निर्णय घेतला असून अहमदनगरमध्ये २६ जानेवारीला शहरातील ७ ठिकाणी ही शिवथाळी सुरू होणार आहे.
जिल्हा प्रशासनाने तसे नियोजन केले असून शहरासाठी एका दिवसांत ७०० थाळ्या देण्यात येणार आहे. राज्य शासनाने १ जानेवारीला १० रुपयांत थाळी देण्याचा निर्णय घेतला होता . त्यानुसार राज्यात प्रायोगिक तत्वावर रोज १८ हजारथाळ्या दरदिवशी द्यायच्या देणार असून यातील नगरसाठी ७०० थाळ्या मंजूर झाल्या आहेत.
गर्दीच्या ठिकाणी सुरू असणाऱ्या भोजनालयांची निवड करून जिल्हा प्रशासनाने ही प्रक्रिया पार पाडावी असे शासन निर्णयात म्हटले आहे. यासाठी जिल्हाधिकारी, महापालिकेचे आयुक्त व जिल्हा पुरवठा अधिकारी अशी तीन सदस्यीय समिती निर्नात घेणार आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी ६ ते १० जानेवारी काळात सक्षम भोजनालयांची पाहणी करून त्यानंतर निवड केलेल्या भोजनचालकांचे प्रशिक्षण वर्ग घेऊन त्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात येणार आहेत.
शहरातून काही इच्छुकांचे प्रस्ताव आले आहेत. त्यात रेल्वेस्थानक, स्वस्तिक, तारकपूर व माळीवाडा बसस्थानके, तसेच जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालय व तारकपूर येथील एक अशा सात ठिकाणच्या भोजनालयांची पाहणी आतापर्यंत जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी केली आहे.
या योजनेनुसार ७ भोजनालायांना प्रत्येकी १०० अशा ७०० थाळ्या अहमदनगर शहरासाठी मंजूर करण्यात आल्या असून. प्रायोगिक तत्वावर राबवल्यावर योजनेतील त्रुटी आढळल्यास त्या दूर करून पुढील आर्थिक वर्षात अधिक व्यापकरित्या हि योजना राज्यात राबवण्यात येणार असल्याच सरकारकडून सांगण्यात येतंय.


