नाशिक : नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीच्या पाईप लाईनला बुधवारी (दि. २१) साडेबारा वाजेच्या सुमारास गळती लागली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गळती आटोक्यात आली असून वैद्यकीय सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.
नाशिकमध्ये आधीच ऑक्सिजनची कमालीची कमतरता आहे. गंभीर बाब म्हणजे या रुग्णालयात गंभीर प्रकृती असलेले सुमारे १२० हुन अधिक रुग्ण हे व्हेंटिलेटर व ऑक्सिजनवर होते. आतापर्यंत या दुर्घटनेमुळे ऑक्सिजन अभावी २२ रुग्णांचा मृत्यू झाला असून हा आकडा अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे प्रकरण गंभीर असून तब्बल २ तास ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने परिस्थिती विदारक असल्याचं दिसून आलं.
यानंतर, राज्याचे मंत्री व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रुग्णालयात जाऊन परिस्थितीची पाहणी केली आहे. याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, नाशिक महापालिका प्रशासनाकडून ५ लाख रुपयांची मदत मृत नातेवाईकांना देण्यात येणार आहे. तर, सरकारकडून ५ लाख रुपयांची मदत अशी एकूण १० लाखांची मदत मृत नातेवाईकांना मिळणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- मी देशासाठी मरतो, पण माझ्या पत्नीला रुग्णालय मिळेना; BSF जवानाची हतबलता
- महाराष्ट्र शोकमग्न आहे! मृत रुग्णांच्या नातेवाईकांचे अश्रू कसे पुसू ? – मुख्यमंत्री
- अहो सरकार तुम्हाला लाज तरी कधी वाटणार ! नाशिक दुर्घटनेत शासन-प्रशासनाकडून सामान्यांचा खून…
- ‘केद्रांची लसीकरण मोहीम नोटबंदीप्रमाणेच, फायदा केवळ उद्योपतींनाच’, राहुल गांधींचा हल्लाबोल
- नाशिक ऑक्सिजन दुर्घटना : ‘आरोग्यमंत्री राजेश टोपे जाबाबदारी स्वीकारणार का ?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

