🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे संतप्त जमावाने सावंत यांची गाडी फोडली आहे. ही घटना बार्शी शहरातील बार्शी-लातूर बायपास रोडवर घडली.अपघात होते वेळी तानाजी सावंत देखील गाडीत असल्याची अफवा उठवली जात आहे. यावर बार्शीचे शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
आंधळकर म्हणाले की, तानाजी सावंत हे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये आहेत. त्यांचे टॉवर लोकेशन काढल्यास सत्य समोर येईल. त्यांचा मुलगा देखील कॉलेजला असल्याची माहिती आहे. अपघाता वेळी केवळ सावंत यांचा चालक गाडीमध्ये होता. त्यामुळे कोणीही राजकारण करू नये. बार्शी शिवसेनेच्या वतीने आम्ही मयत व्यक्तीच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी आहोत.
दरम्यान BIT कॉलेजनजीकच्या शेळगाव फाटयाजवळ तानाजी सावंत यांच्या फॉर्चुनर गाडीने स्पेलंडर NXG MH13AQ 2782 या गाडीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात शामकुमार देविदास व्हळे (वय 40 )राहणार व्हळे शेलगाव हे जागीच ठार झाले. मंत्र्यांच्या वाहनाने एका तरुणाचा जीव घेतल्यामुळे संतप्त जमावाने तानाजी सावंत यांची गाडी फोडली असल्याचं सांगण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1178574925931540480?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1178574685912461312?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
