Share

कुलभूषण जाधव यांची लवकरचं सुटका होऊ शकते – दुर्रानी

Published On: 

कराची – हेरगिरी आणि दहशतवादी कारवाया केल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानने अटक केलेल्या कुलभूषण जाधव यांना लवकरच भारतात पाठवल्या जाऊ शकते असं मत आयएसआयचे माजी प्रमुख मोहम्मद असद दुर्रानी यांनी व्यक्त केले आहे.

मोहम्मद असद दुर्रानी, रॉ चे माजी प्रमुख ए एस दुलत आणि पत्रकार आदित्य सिन्हा यांनी ‘द स्पाय क्रॉनिकल्स : रॉ, आयएसआय अँड द इल्युजन ऑफ पीस’ हे पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकात दुर्रानी यांनी कुलभूषण जाधव यांच्याबाबत बोलताना पाक लवकरच त्यांची सुटका करू शकते असं म्हंटल आहे.

२०१६ साली कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातून अटक करण्यात आली. पाकिस्तानी लष्कराने त्यांच्यावर दहशतवादी कारवाया आणि हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली खटला चालवला. १० एप्रिल २०१७ रोजी पाकिस्तानी कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती.

दरम्यान या प्रकरणी भारताने आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव घेतली. १८ मे २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय कोर्टाने पाकिस्तानला जोरदार धक्का देत कुलभूषण यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली. सध्या हे प्रकरण आंतरराष्ट्रीय कोर्टात आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!